जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार ओंकारेश्वर धरणावर

2022-23 पर्यंत 600 मेगावॅट वीज निर्मिती करेल
Omkareshwar Dam
Omkareshwar Damesakal

मध्य प्रदेश राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढवण्याच्या आणि त्या भागातील विजेच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने, खंडवा येथे एक तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. जो 2022-23 पर्यंत 600 मेगावॅट वीज निर्मिती करेल, अशी माहिती बुधवारी तेथील आधिकाऱ्यांनी दिली आहे.

जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्लांट म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रकल्पाची किंमत 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव संजय दुबे यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, "ओंकारेश्वर धरण हे नर्मदा नदीवर बांधले आहे. हा आमचा जलविद्युत प्रकल्प आहे आणि यामध्ये आम्ही पाण्यापासून ऊर्जा निर्माण करतो, हा जलविद्युत प्रकल्प सुमारे 100 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे."

दुबे यांनी असेही सांगितले की, या भागातील पाण्याच्या पातळीत होणारा बदल जास्त नाही आणि त्यामुळे ते योग्य ठिकाण आहे.

Omkareshwar Dam
कऱ्हाड : कोयना ६० वर्षांत ५२ वेळा पूर्ण क्षमतेने

दुबे यांनी हे देखील अधोरेखित केले की, नवीन फ्लोटिंग सोलर प्लांटमुळे, खंडवा हा मध्य प्रदेशातील औष्णिक ऊर्जा केंद्र, जलविद्युत आणि सौर ऊर्जा असणारा एकमेव जिल्हा बनणार आहे.

"पुढील टप्प्यात, आम्ही आणखी 300 मेगावॅटसाठी निविदा मागवल्या आहेत, त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प असेल ज्याला फ्लोटिंग सोलर म्हटले जाईल. खांडवा हा राज्यातील एकमेव जिल्हा असेल ज्यामध्ये सौर, जलविद्युत आणि थर्मल या तीनही गोष्टी असतील. एकाच जिल्ह्यातून 4,000 मेगावॅटपेक्षा जास्त वीजनिर्मिती केली जाईल,” असंही दुबे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com