...तर देशात एकत्रित निवडणूक शक्य : निवडणूक आयुक्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत विधी आयोगाला पत्र लिहिल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला येत आहे. रावत म्हणाले, देशात यापूर्वीच्या चार निवडणुका एकत्रित झाल्या. यासाठी कायद्यात दुरूस्तीची गरज असून, पुरेशा प्रमाणात मशिन्स आणि सुरक्षा पुरवली तर असे शक्य आहे, असे रावत म्हणाले.

नवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीला देशात जोर दिला जात आहे. त्यानंतर आता यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले, की सध्याच्या परिस्थितीत देशात एकत्रित निवडणूक घेणे शक्य नाही. तसेच जर योजनाबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केल्यास अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुका घेणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत विधी आयोगाला पत्र लिहिल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला येत आहे. रावत म्हणाले, देशात यापूर्वीच्या चार निवडणुका एकत्रित झाल्या. यासाठी कायद्यात दुरूस्तीची गरज असून, पुरेशा प्रमाणात मशिन्स आणि सुरक्षा पुरवली तर असे शक्य आहे, असे रावत म्हणाले. राज्य विधानसभा सहमत झाल्या तर एकत्रित निवडणुका शक्य आहेत. केंद्र सरकार आगामी लोकसभा निवडणुकांबरोबर 10 ते 11 राज्यांची विधानसभा निवडणूकही घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जर संपूर्ण देशात एकत्रित निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यासाठी घटनेत दुरूस्ती करावी लागेल. त्याशिवाय कोणताही पर्याय नाही. 

दरम्यान, 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीसाठी राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहेत. यातच अमित शहा यांनीदेखील वन नेशन, वन इलेक्शनचा मुद्दा उपस्थित केला.  

Web Title: then Assembly and Loksabha election will conduct together says Election Commissioner