...तरच पाकशी संवाद साधू : सुषमा स्वराज

then India will talk to Pakistan says Union Minister Sushma Swaraj
then India will talk to Pakistan says Union Minister Sushma Swaraj

नवी दिल्ली : ''पाकिस्तानकडून भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला जाणार नाही'', असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) दिला. तसेच भारत 'सार्क' परिषदेला उपस्थित राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 

हैदराबाद येथे पत्रकार परिषदेत स्वराज बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवणार नाही. तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणताही संवाद साधला जाणार नाही. तसेच भारत सार्क परिषदेला उपस्थित राहणार नाही''. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. स्वराज यांनी पाकिस्तानच्या इस्माबादकडून देण्यात आलेले आमंत्रण स्वीकारले नाही.

तसेच स्वराज पुढे म्हणाल्या, ''गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार कर्तापूर कॉरिडोरबाबत विचारणा करत आहे. मात्र, फक्त पाकिस्तानकडून सकारात्मक उत्तर मिळत आहे. द्विपक्षीय चर्चा सुरु होणार असा त्याचा अर्थ नाही. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही".

दरम्यान, कर्तापूर कॉरिडोरसाठी पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी यापूर्वी भेट दिली होती. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल हे देखील जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com