...तर दुसरे लग्न वैध : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पती किंवा पत्नीकडून घटस्फोटाविरोधात दाखल करण्यात आलेले अपील अर्ज फेटाळण्यापूर्वी पक्षकारांमध्ये जर खटला मागे घेण्यासाठी समझोता झाला असेल, तर दुसरे लग्न करण्यावर बंदीबाबतची तरतूद लागू होत नाही. '

नवी दिल्ली : पती किंवा पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात येतो. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये खटला मागे घेण्याबाबत सामंजस्य निर्माण झाला असेल तर घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करता येईल, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

पती किंवा पत्नीकडून घटस्फोटाविरोधात दाखल करण्यात आलेले अपील अर्ज फेटाळण्यापूर्वी पक्षकारांमध्ये जर खटला मागे घेण्यासाठी समझोता झाला असेल, तर दुसरे लग्न करण्यावर बंदीबाबतची तरतूद लागू होत नाही. 'हिंदू मॅरेज अॅक्ट'नुसार घटस्फोटाविरोधातील अपील प्रलंबित असल्यास दोघांपैकी कोणत्याही पक्षकाराला दुसरे लग्न करता येत नाही. त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले, की पती किंवा पत्नी दोन्ही पक्षांमध्ये खटला मागे घेण्याबाबत सामंजस्य निर्माण झाला असेल तर घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करता येईल.

Web Title: Then second marriage will valid says Supreme Court