डाव्यांच्या सत्ताकाळात सामूहिक हल्ले नाहीत : माणिक सरकार

पीटीआय
सोमवार, 30 जुलै 2018

नवी दिल्ली : जनतेला दिलेली अश्वासने पूर्ण करण्यात सरकारला अपयश आल्यानंतर नागरिक त्याबाबत सरकारला जाब विचारण्यास सुरवात करतात. मात्र, अशा वेळी लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी समूहांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या (मॉब लिंचिंग) घटनांचा वापर केला जातो, असा आरोप त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी आज केला. अलीकडील काळात समूहाकडून होणाऱ्या हत्यांच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्रिपुरात डाव्या आघाडीची सत्ता असताना 25 वर्षांत अशी घटना घडली नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

डाव्या पक्षांनी सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी माणिक सरकार हे दिल्लीत आले आहेत. ते पुढे म्हणाले, की केंद्रातील आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी लहान मुलांचे अपहरण, समूहाकडून होणाऱ्या हत्या आणि गौरक्षेच्या नावाखाली केले जाणारे हल्ले, अशा घटनांचा वापर भाजपकडून केला जातो. केंद्राप्रमाणेच त्रिपुरामध्येही निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पाळण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. 

Web Title: There are no collective attacks during the Lefts regime Manik Sarkar