"काँग्रेससाठी २० वर्ष काम केलं..."; सचिन पायलट यांनी स्पष्ट केली भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Pilot
"काँग्रेससाठी २० वर्ष काम केलं..."; सचिन पायलट यांनी स्पष्ट केली भूमिका

"२० वर्ष पक्षाचं काम केलं..."; पायलट यांनी स्पष्ट केली भूमिका

sakal_logo
By
सुधीर काकडे

राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारच्या सर्व मंत्र्यांनी काल राजीनामे दिले. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीनंतर हे राजीनामे घेण्यात आले असून, त्यानंतर राज्यात मोठं राजकीय घमासान सुरू झालं आहे. सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असून, काही नवीन लोकांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या घडामोडींवरून आपली प्रतिक्रीया दिली आहे.

हेही वाचा: "गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणू"

राजस्थानमध्ये यापूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती, त्यावेळी सचिन पायलट हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील होतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र सचिन पायलट यांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधींशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं सांगितलं. त्यातच आता काँग्रेस मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलावरून पायलट यांनी, "काँग्रेस सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. पक्षात कोणतीही गटबाजी नसून, एकत्रितरीत्या सर्व निर्णय घेतले जात आहेत" असे सांगितले.

हेही वाचा: मोदींचं मन मोठं, कायदे बनतील-पुन्हा येतील - साक्षी महाराज

दरम्यान, आपण दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. गेल्या 20 वर्षात पक्षाने माझ्यावर दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण निष्ठेने पार पाडल्या. आगामी काळात पक्ष मला जी जबाबदारी देईल ती आपण पुर्ण करू असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top