नव्या कृषी कायद्यांबाबत भीती ठरतेय खरी; व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक!

Farmers
Farmers

Farm Laws : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्याला शेतकर्‍यांचा होणारा विरोध पाहता केंद्र सरकार वारंवार त्यांना हमी देण्याचे आश्वासन देत आहे, पण शेतकरी त्यांच्या मागण्या मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. 

पण काही ठिकाणी शेतकर्‍यांना वाटणारी ही भीती खरी ठरच असल्याचेही दिसून येत आहे. काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेतले, पण त्यांना पैसे न देता ते पळून गेले, तर काही ठिकाणी चेक बाउन्स होण्याचे प्रकार घडले आहेत, अशी प्रकरणे समोर आल्यानंतर कृषी कायद्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी नेते संदीप गिड्डे-पाटील म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका कॉर्पोरेट कंपनीने शेतकऱ्यांसोबत २२ कोटींचा करार केला, पण नंतर त्यांनी दिलेला धनादेश (चेक) बाउन्स झाला. जेव्हा स्थानिक लोक तक्रार देण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे पोहोचले, तेव्हा याबबाबत पोलिसात तक्रार दाखल करता येत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना उपविभागीय दंडाधिकारी (Sub Divisional Magistrate) कार्यालयात जावे लागेल. शेतकऱ्यांची अशी फसवणूक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या राज्यात म्हणजे मध्य प्रदेशात झाली आहे.

नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान जास्त होऊ लागले आहे. अशा प्रकारच्या २०० पेक्षा जास्त तक्रारी संपूर्ण देशभरातून आल्या आहेत. अशा परिस्थितीत या सर्व बाबी केंद्रीय कृषिमंत्री आणि खाद्य मंत्री यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, जेव्हापासून उत्तर प्रदेशात नवीन कृषी कायदे लागू झाले, तेव्हापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. शेतकऱ्यांकडून एमएसपी पेक्षा कमी दराने धान्य खरेदी केले जात आहे. काही भागात आठशे रुपये दराने धान्य खरेदी केली गेली आहे. हे सर्व मुद्दे आम्ही बैठकीत मांडणार आहोत. 

दुसरीकडे पंजाबमधील शेतकरी नेते बलदेवसिंह सिरसा यांनीही नव्या कृषी कायद्यांबाबत आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले, 'जेव्हा नवीन कृषी सुधार कायदे लागू केले गेले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. व्यापाऱ्यांनी खेड्यात आपली कार्यालये (ऑफिस) उघडली, शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी केला आणि लंपासही झाले. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची रक्कम दिली नाही. त्यामुळे केंद्र सरकारसोबतच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. 

बलदेवसिंह यांनी होशंगाबाद आणि मध्य प्रदेशातील गुणा येथील शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी केल्यानंतर पैसे न घेता पळ काढणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी आलेल्या बातम्यांची कात्रणेही यावेळी दाखवली.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com