esakal | ‘बुग्याल’ येथे कॅम्प फायर, रात्रीचा थांबा नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Camp

हिमालयातील पर्वतरांगातील नैसर्गिक कुरणांचे (बुग्याल) संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाने परिसरातील पर्यटकांचा रात्रीचा थांबा, छावणी उभारणे, कॅम्प फायर यावर बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यास दंड आकारला जाणार आहे. 

‘बुग्याल’ येथे कॅम्प फायर, रात्रीचा थांबा नाही

sakal_logo
By
पीटीआय

पिठोरागड (उत्तराखंड) - हिमालयातील पर्वतरांगातील नैसर्गिक कुरणांचे (बुग्याल) संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाने परिसरातील पर्यटकांचा रात्रीचा थांबा, छावणी उभारणे, कॅम्प फायर यावर बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यास दंड आकारला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुनसयारी वन क्षेत्रात ३५०० मीटर उंचीवर खलिया बुग्याल येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र या वर्दळीमुळे आणि कॅम्प फायरमुळे हिमालयीन कुरणांची हानी होत आहे. तसेच प्रदूषण वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून तक्रारी आल्याने त्याला रोखण्यासाठी वनविभागाने उपाय केले. नव्या आदेशानुसार बुग्यालला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण आणले. आता २०० पर्यटकच फक्त दिवसाला भेट देऊ शकतील, असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. रात्रीचा मुक्काम, कॅम्प फायर किंवा छावणी उभारण्यावर मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक केवळ दिवसाच भेट देऊ शकतील. कॅम्प फायरमुळे कुरण नष्ट होत चालले आहेत. तसेच मातीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात खलिया बुग्याल येथे फुले बहरतात. या काळातही पर्यटकांची गर्दी असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड केला जाणार आहे. छावणी उभारण्यासाठी खड्डे केले जातात आणि त्यावरही बंदी घातली आहे.

काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी

पिथौरागडच्या धारचूला आणि मुनसयारी क्षेत्रात ५० हून अधिक बुग्याल (कुरण क्षेत्र) आहेत. हिवाळ्यात हे कुरण बर्फाने आच्छादित असतो आणि उन्हाळ्यात येथे फुल आणि कुरण बहरतात. या आकर्षणापोटी देश विदेशातील पर्यटक खलिया बुग्यालसह अन्य बुग्याल ठिकाणी येतात. छावणी उभारुन कुरणात राहण्यास पसंती देतात. 

पिठोरागडचे प्रमुख कुरण क्षेत्र (बुग्याल)
पिंडारी बुग्याल, नामिक बुग्याल, जोहार बुग्याल, राहली बुग्याल, थाल बुग्याल, खलिया बुग्याल हे प्रसिद्ध कुरण क्षेत्र असून तो भाग संरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. पहिल्या टप्प्यात खलिया बुग्याल येथे काम केले जात आहे. पर्यटकांना मर्यादित संख्येने प्रवेश दिला जाणार असून तेथे रात्री थांबण्यास मनाई केली आहे. 

Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड

बुग्याल म्हणजे काय
उत्तराखंडच्या हिमालयीन पर्वतीय भागात वृक्षांच्या रांगा जेथे संपतात, तेथून हजारो मैलाच्या अंतरावर कुरण पसरलेले असते. साधारणपणे हे कुरण आठ ते दहा हजार फूट उंचीवर असतात. या मैदानाला बुग्याल असे म्हणतात. बुग्याल हे हिम रेषा आणि वृक्ष रेषा यादरम्यानचे क्षेत्र असते. स्थानिक नागरिक आणि गुराख्यांसाठी चारा-वैरण म्हणून याकडे पाहिले जाते. तर पर्यटकांना आणि गिर्यारोहकांसाठी ही आरामाची जागा म्हणून समजली जाते.

Edited By - Prashant Patil