Amritsar Rail Accident : प्रशासनाच्या अपयशामुळे अपघात ; भाजपचा आरोप

वृत्तसंस्था
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : अमृतसर येथे रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या दुर्घटनेत 61 हून अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पंजाब सरकारचा निष्काळजीपणा आहे आणि प्रशासनाच्या अपयशामुळे हा अपघात झाला, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.  

अमृतसरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच काही लोक रेल्वेरुळावर थांबले होते. त्यादरम्यान आलेल्या रेल्वेने यातील काहींना चिरडले. यामध्ये 61 हून अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची सरकारी मदत देण्यात येईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले होते. 

त्यानंतर आता प्रशासनाच्या अपशयामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पंजाब सरकारचा निष्काळजीपणा आहे. हे प्रकरण कलम 304 (ए)चे आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे कलम या सरकारवर आणि प्रशासनावर का लावू नये ? असा सवालही पात्रा यांनी केला आहे. तसेच यातील मृतांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title: There was an administrative failure on the part of the Punjab government says BJP Sambit Patra