प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती - अहमद पटेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्‍वासू आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

नवी दिल्ली : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्‍वासू आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा यांनीही ट्‌विटवरून या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली होती. "माझ्या वडिलांचे तेथील भाषण लोक कदाचित विसरून जातील; पण या भेटीबाबत विसरणार नाहीत. खोट्या बातम्या पसरविण्यास भाजप आणि संघाला यामुळे मदतच होणार आहे,' असे शर्मिष्ठा म्हणाल्या होत्या. त्याही कॉंग्रेसच्या नेत्या आहेत. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना अहमद पटेल यांनी आपलीही नाराजी व्यक्त केली आहे. शर्मिष्ठा यांनी भाजपप्रवेश केल्याच्या अफवाही परसल्या होत्या. मात्र, "मी एकवेळ राजकारण सोडेन; पण भाजपमध्ये जाणार नाही,' असे सांगत त्यांनी अफवांना उत्तर दिले. 

Web Title: There was no expectation from Pranabdas says Ahmed Patel