esakal | शेजाऱ्याची मोडली खोड! लग्नाला आलेली स्थळे परत पाठवत होता म्हणून रागावलेल्या तरुणाने दुकानावर चालवला जेसीबी 
sakal

बोलून बातमी शोधा

As there was no marriage in Kerala the young man climbed JCB

शिक्षण होऊन चांगली नोकरी व उद्योग व्यवसायात मुलगा सेट झालं की त्याच्या लग्नाची तयारी केली जाते.

शेजाऱ्याची मोडली खोड! लग्नाला आलेली स्थळे परत पाठवत होता म्हणून रागावलेल्या तरुणाने दुकानावर चालवला जेसीबी 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : शिक्षण होऊन चांगली नोकरी व उद्योग व्यवसायात मुलगा सेट झालं की त्याच्या लग्नाची तयारी केली जाते. मग त्यासाठी बायोडाटा तयार करणे, जवळच्या व्यक्तींना स्थळ पाहण्यासाठी सांगणे किंवा वधू- वर सुचक मेळाव्यासाठी नोंदणी करणे अशी पद्धत सहसा राबवली जाते. 

काही ठिकाणी जवळचे नातेवाईक नसतील तर भविष्यात शंका नको म्हणून गावातील व शेजारील माणसांकडून संबंधीत कुटुंबाची चौकशी केली जाते. त्या संबंधित कुटुंबाची संपूर्ण चौकशी करुनच नातेसंबंध जोडले जातात. काही ठिकाणी शेजारील व्यक्तींचे अन्‌ संबंधित कुटुंबाचे जमत नसेल तर ते अडचणीचे ठरु शकते. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. हा प्रकार केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील आहे, या संदर्भातील एका संकेतस्थळाने बातमी दिली आहे.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात तरुणाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे घर जेसीबीने पाडले आहे. शेजारील व्यक्तीमुळे लग्न जमत नसल्याचा त्याचा आरोप आहे. लग्नासाठी एखाद स्थळं पक्क करण्याआधी अनेकदा शेजाऱ्यांकडे कुटुंबाबद्दल, मुलाबद्दल चौकशी केली जाते. शेजारी काय सांगतील यावरच अनेकदा समोरील कुटुंब निर्णय घेते. अशीच एक घटना समोर आली आहे. 

शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमुळे लग्नाची स्थळं परत जाण्याने तरुण संतापला आणि त्याने धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तरुणाने थेट शेजाऱ्याच्या दुकानावर जेसीबी चालवला. घरा शेजारील दुकानमालक लग्नासाठी येणारी स्थळं परत पाठवत असल्याने अल्बिन नाराज होता. जेसीबीच्या सहाय्याने त्याने संपूर्ण दुकानाची तोडफोड केली असून जमीनदोस्त केलं. त्याने याबाबतचा सोशल मीडियावर जेसीबी चालवतानाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दुकानात अनेक गैरप्रकार सुरु असल्याचं तो सांगत आहे. 

त्याच्या म्हणण्यानुसार या दुकानात बेकायदेशीर सट्टा, दारुचा धंदा सुरु होता. पोलिस किंवा गाव प्रशासनाकडून आम्हाला कोणतंही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने हे दुकान मी पाडत आहे. यावेळी अल्बिन आपल्यासाठी येणारे लग्नाचे अनेक प्रस्ताव दुकान मालकाने परत पाठवल्याचं म्हणत आहे. यानंतर अल्बिन जेसीबी चालवत दुकानाची तोडफोड करताना व्हिडीओत दिसत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अल्बिनला अटक केली आहे.