'अभिनंदनला सोडलं नसतं तर युद्ध झालं असतं'

'अभिनंदनला सोडलं नसतं तर युद्ध झालं असतं'

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, अभिनंदन यांना भारतात सोडण्यात आले नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार राहावे, असा इशारा भारताकडून देण्यात आला होता, अशी माहिती मिळत आहे.

हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे 27 फेब्रुवारीला एअरस्ट्राईकची कारवाई केली होती. त्यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या एफ 16 या विमानाचा पाठलाग करत पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले होते. त्यानंतर सुमारे 60 तासांपेक्षा अधिक वेळ ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. तसेच पाकिस्तानने जर अभिनंदन यांना भारतात सोडले नसते तर युद्ध झाले असते. तशी तयारीही भारताकडून करण्यात आली होती. याशिवाय भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी या उभय देशातील गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कातही होते. 

दरम्यान, वर्धमान आमच्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानने घोषित केल्यानंतर भारताकडून या हालचाली केल्या गेल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com