'त्यांनी' पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी केला होता धार्मिक विधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

नवी दिल्ली : बुऱ्हाडी सामूहिक मृत्यू प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. अनेक गुढ या प्रकरणामागे आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या नोंदवहीमध्ये आता आत्मामुक्तीसाठी घरात ‘बाध तपस्या’ (सात दिवस वडाच्या झाडाची पूजा) विधी करण्यात आल्याचे समोर आले आहे. ललित यांनी आपल्या नोंदवहीत वडिलांसाह, पुर्वजांच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी हा विधी केल्याचे म्हटले आहे. पुर्वजांच्या आत्मा्यांना अजूनही मुक्ती मिळाली नसून, त्यांचे आत्मे घरामध्येच अडकले आहेत, अशी या वहीत नोंद आहे.

नवी दिल्ली : बुऱ्हाडी सामूहिक मृत्यू प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. अनेक गुढ या प्रकरणामागे आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या नोंदवहीमध्ये आता आत्मामुक्तीसाठी घरात ‘बाध तपस्या’ (सात दिवस वडाच्या झाडाची पूजा) विधी करण्यात आल्याचे समोर आले आहे. ललित यांनी आपल्या नोंदवहीत वडिलांसाह, पुर्वजांच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी हा विधी केल्याचे म्हटले आहे. पुर्वजांच्या आत्मा्यांना अजूनही मुक्ती मिळाली नसून, त्यांचे आत्मे घरामध्येच अडकले आहेत, अशी या वहीत नोंद आहे. त्यामुळे 11 जणांनी गळफास घेतल्यास आत्मामुक्ती होईल या अंधश्रद्धेपोटीच 11 जणांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची शंका व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितने आपल्याला वडिलांकडून बाध तपस्या विधी करण्याचा आदेश मिळाला असल्याची नोंद केली आहे. ज्यामुळे घरात अडकलेल्या पुर्वजांचे आत्मे मुक्त होतील. तसेच या वहीत सज्जन सिंह, हिरा, दयानंद आणि गंगा देवी अशी नावे लिहिण्यात आली आहेत. या व्यक्ती कोण आहेत.तसेच त्यांचा या कुटुंबाशी काय संबंध आहे.याचा तपास पोलिस करत आहे. 

‘माझ्यासोबत चार आत्मे भटकत आहेत…' असे वाक्य वहीत सुरुवातीला लिहिण्यात आले आहे. तसेच 9 जुलै 2015 मध्ये लिहिण्यात आलेल्या एका नोंदीत ललितने आपल्या वडिलांचा आत्मा आपल्याशी संवाद साधत असल्याचा दावा केला आहे. ‘मतभेद असतानाही कुटुंब एका छताखाली नांदत असल्याचा मला आनंद आहे. जर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलला तर आम्हाला शांती मिळेल. तुम्ही हरिद्वारला जाऊन अंत्यविधी करण्याचा विचार करताय, पण मी बाध तपस्या पूर्ण होण्याची वाट पाहतोय’, आला उल्लेख या नोंदवहीत आहे.

ललितची अजून एक नोंद सापडली असून, त्यात त्याने बाध तपस्या चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे म्हटले आहे. ही बाध तपस्या मोठमोठ्या समस्यांवरील उपाय आहे’, असे यात लिहिले आहे.

Web Title: they does traditional rituals for souls bhatia family

टॅग्स