
उत्तर प्रदेशातील कानपूरनंतर आता राजधानी लखनऊमध्ये ‘मनी हाइस्ट’ या वेबसीरिजसारखी चोरीची घटना घडली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेची भिंत तोडून चोरट्यांनी लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बँकेच्या इमारतीच्या पलीकडे असलेल्या मोकळ्या भूखंडातून भिंत खोदून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. यानंतर चोरट्यांनी ग्लॅडर कटरने बँकेच्या लॉकर रूमचे कुलूप कापून हा गुन्हा केला. ही संपूर्ण घटना बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला.