
Third Party Insurance Rules: नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे थर्ड पार्टी विमा नसेल तर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार नाही. इतकंच नाही तर फास्ट टॅगसाठीही तुम्हाला विम्याची कागदपत्रे दाखवावी लागतील. तुम्हाला तुमच्या गाडीचा थर्ड पार्टी विमा फास्टॅगला लिंक करावा लागेल. जर तुमच्याकडे थर्ड पार्टी विमा प्रूफ असेल तरच इंधन खरेदी करता येईल. इतर सुविधांचाही लाभ घेण्यासाठी थर्ड पार्टी विमा गरजेचा असेल. जर तुम्ही विम्याशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. सरकारने इंधन खरेदी, फास्टॅग, प्रदूषण आणि लायसन्स सर्टीफिकेट घेण्यासाठी वाहनांचा विमा दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय.