आनंदाची बातमी; भारतात पुढील आठवड्यात लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

कोविड-19 लस (Covid-19 vaccine)संबंधी करार करण्यास भारत सरकार तयारी करत आहे.

नवी दिल्ली- कोविड-19 लस (Covid-19 vaccine)संबंधी करार करण्यास भारत सरकार तयारी करत आहे. देशात सध्या तीन  (Vaccine Trial In India) लशींची चाचणी सुरु झाली आहे. याशिवाय आणखी दोन म्हणजे एकूण पाच कंपन्यांसोबत भारताने चर्चा सुरु केली आहे. लशीला मंजुरी दिल्यानंतर किती लवकर आणि किती किंमतीमध्ये लस (Coronavirus Vaccine) तयार करुन दिली जाईल, याबाबतचा रोड मॅप या कंपन्यांना तीन दिवसात देण्यास सांगण्यात आला आहे.  

टाटाला मागे टाकणारी Dream 11 कंपनी आहे तरी काय?

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका (Oxford-AstraZeneca vaccine) कोरोनावरील लस निर्माण करण्यात आघाडीवर आहे. लस सध्या परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. 2020 च्या शेवटपर्यंत लस लाँच करण्याची तयारी केली जात आहे. एका अहवालानुसार, 2021 सालच्या सुरुवातीला ही लस सार्वजनिकरित्या सर्वांसाठी उपबल्ध असेल. तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण यूके, यूएस, ब्राझील आणि दक्षिण आफ्रीका येथे केले जात आहे. भारतात सीरम इंस्टिट्यूटकडून पुढच्या आठवड्यात परिक्षण सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

भारत बायोटेक आणि आयसीएमआर (ICMR) तयार करत असलेल्या लशीचे पहिल्या टप्प्यातील निकाल आले आहेत. माध्यमातील बातम्यांनुसार, लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोणत्याही स्वयंसेवकामध्ये दुष्परिणाम दिसून आले नाहीत. पुढच्या टप्प्यात लशीच्या प्रभावीपणाची खात्री करुन घेतली जाईल. पहिल्या टप्प्यातील चाचणीत देशातील विविध 12 ठिकाणी 375 स्वयंसेवकांवर परिक्षण करण्यात आले होते. 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिवर्सिटी-अस्त्राजेनेकाच्या बनवलेल्या लसीची चाचणी सुरु केली आहे. कोविशील्ड नावाच्या लशीसाठी सीरम इंस्टिट्यूट आणि अस्त्राजेनेका यांच्यात करार झाला आहे. देशभरातील 10 केंद्रावर लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होईल. सीरम इंस्टिट्यूटला 100 कोटी लस निर्माण करण्याची परवानगी मिळाली आहे. 

भारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका; 38 बड्या कंपन्यांवर बंदी

अमेरिका, ब्रिटेन, युरोपियन युनियन प्रमाणे भारताने अजून कोणत्याही कंपनीशी करार केला नाही. मात्र, भारत या प्रयत्नात आहे. कोरोना संबंधी बनवण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाने सोमवारी अनेक दिग्गज फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. या भेटीमध्ये 5 कंपन्यांना पुढचा रोड मॅप तयार करण्यास सांगण्यात आलं आहे.  

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यात लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी मॅक्सिको आणि अर्जेंटीनाच्या अधिकाऱ्यांसोबत एक करार केला आहे. एसआईआई प्रमुख आदर पुनावाला यांनी 2020 च्या शेवटापर्यंत भारतीयांना कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणात लस निर्माण केले जाईल, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third phase of testing begins next week in India