esakal | सावधान! संसर्ग पुन्हा वाढतोय; WHO कडून तिसऱ्या लाटेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! संसर्ग पुन्हा वाढतोय; WHO कडून तिसऱ्या लाटेचा इशारा

सावधान! संसर्ग पुन्हा वाढतोय; WHO कडून तिसऱ्या लाटेचा इशारा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट स्थिर होऊन संसर्गाचे प्रमाण तीस हजारांकडे येत असतानाच नव्याने संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत ४२ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा प्रसार वाढत चालल्याचे स्पष्ट करत तिसऱ्या लाटेचे सूतोवाच केले आहे. कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर देशभरातील सर्व राज्यांनी लॉकडाउन आणि निर्बंध शिथिल केले आहेत. लोक घराबाहेर पडल्याने गर्दी वाढू लागली असून, कोरोना विषयक नियमांकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. दुसरी लाट कायम असतानाच नियम धुडकावले जात असून, कोरोना संसर्गाचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यात लसीकरणाचा वेग मर्यादित असल्याचे कोरोना धोका कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी वाढत्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाउन, निर्बंध शिथिल करण्याबरोबरच लसीकरणाचा वेग कमी असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना थांबला आहे, असे आताच म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोक घराबाहेर पडले

लॉकडाउनला वैतागून लोक घराबाहेर पडू लागले आहेत. नियमांचे योग्य पालन केले जात नाही. हे वर्तन तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकते.काही देशांमध्ये लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे तर दुसरीकडे काही देशांत ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रुग्णसंख्याही कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोना थांबलेला नाही, असा इशारा स्वामीनाथन यांनी दिला आहे. आफ्रिकेचे उदाहरण देताना, दोन आठवड्यात तिथे मृत्यूदर ३० टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: 'ही चलाखी राज्यात चालणार नाही'; पवारांनी फडणवीसांना सुनावलं

डेल्टा प्रकार घातक

कोरोनाचे बदलते रूपही घातक आहे. डेल्टा हा प्रकार आतापर्यंतचा सर्वांत गंभीर होता. दुसऱ्या लाटेला हा प्रकार कारणीभूत ठरला. त्याचा वेगाने फैलाव झाला आहे. मूळ विषाणूमुळे संसर्ग झालेली व्यक्ती तिघांना बाधित करीत असेल, तर डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेली व्यक्ती आठ जणांना बाधित करते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. या प्रकारामुळे भारतात दुसरी लाट आली आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: प्रीतम मुंडेंना डावलल्याने नाराजीचा स्फोट; भाजपमध्ये राजीनामासत्र

राज्यातील स्थिती चिंताजनक

आता डेल्टा प्लस हा विषाणूचा प्रकार महाराष्ट्रासह तीन राज्यांत आढळला आहे. त्याने बाधित केलेली रुग्णसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. आता महाराष्ट्रात कोरोना निर्बंध देखील शिथिल झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. सातारा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. नागरिकांबरोबरच प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष भविष्यात गंभीर लाटेला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत.

loading image