esakal | प्रीतम मुंडेंना डावलल्याने नाराजीचा स्फोट; भाजपमध्ये राजीनामासत्र
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

प्रीतम मुंडेंना डावलल्याने नाराजीचा स्फोट; भाजपमध्ये राजीनामासत्र

sakal_logo
By
नामदेव कुंभार

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे दिले. दोन वेळा खासदार आणि विक्रमी मतांनी विजय मिळविलेल्या डॉ. मुंडे उच्चशिक्षित असल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी समर्थकांना आशा होती. मात्र, त्यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे. यातून जिल्ह्यात दोन दिवसांपासून राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

सोशल मीडियावर मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता थेट भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं असून बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच ११ तालुकाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच याशिवाय इतरही काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी विविध तालुकांचे भाजपचे अध्यक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. काही पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनीही आपले राजीनामे दिले. मात्र, ते मंजूर करण्याचा अधिकार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना नाही.

हेही वाचा: 'ही चलाखी राज्यात चालणार नाही'; पवारांनी फडणवीसांना सुनावलं

माजी जि. प.अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सविता गोल्हार, भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांच्यासह 4 जिल्हा परिषद सदस्य, 3 पंचायत समिती सदस्य, 6 नगरसेवक या 13 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांच्यासह अकरा तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह विविध जिल्हा बॉडीवरील पदाधिकारी व आघाड्यांचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत या 47 जणांनी राजीनामे दिले असून आणखीनही आज पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाराज पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्षात समजून कोण काढणार ? हे नाराज पदाधिकारी ऐकणार का ? पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.

हेही वाचा: तो एक फोन... अन्‌ १२ मंत्री बाद

प्रीतम मुंडे यांना डावलल्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या नाराजीचे लोण अहमदनगरपर्यंत पोहोचले आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

loading image