
अजित पवारांचे दौरे होतात ही चांगली गोष्ट आहे. वास्तविक, हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण..
अजित पवारांनी आमच्या आज्ञेचं पालन करावं : उदयनराजे
सातारा : जिल्ह्यात अजित पवारांनी जास्तीत-जास्त दौरे करावेत आणि माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम 'मंत्री' या नात्याने त्यांनी करावे. आम्ही वेळोवळी सूचना देऊ, त्या त्यांनी आचरणात आणाव्यात, असा खोचक सल्ला खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना साताऱ्यातील दौऱ्यावरून दिला आहे.
साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी, सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे अलिकडच्या काळात वाढले आहेत. याविषयी विचारले असता, खासदार उदयनराजे म्हणाले, अजित पवारांचे दौरे होतात ही चांगली गोष्ट आहे. वास्तविक, हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण, ते माझ्या मताशी सहमत आहेत. ते सातारा जिल्ह्याचा नक्की विकास साधतील.
ते पुढे म्हणाले, पवारांनी जास्तीत-जास्त दौरे सातारा जिल्ह्यात करावेत. माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देत जाऊ, त्या सूचना आचरणात आणण्याचे काम तुमच्यासारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केले पाहिजे. ते करतीलही. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ते झटत आहेत, ही चांगली बाब आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.