'नोटाबंदीचे विरोधक, काळ्या पैशाचे समर्थक नाहीत'

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणारे काळ्या पैशाचे समर्थन करत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील के टी एस तुलसी यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, "जर कोणी नोटाबंदीला विरोध करत असेल तर तो काळ्या पैशाचा समर्थक नसतो. मोदी सरकारची हा एक मोठा निर्णय आहे. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे किंवा त्यांनी हा निर्णय मागे घ्यायला हवा. त्यानंतरच संपूर्ण प्रकरण थांबेल आणि संसदीय कामकाज व्यवस्थित सुरु राहील. सरकार प्रतिष्ठेवर अडून बसले आहे. संसदीय कामकाज सुरु ठेवण्यासाठी काही लवचिकता असायला हवी.' तसेच विरोधक काळ्या पैशाचे समर्थन करत असल्यानेच नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करत असल्याचे चित्र तुम्ही निर्माण केले आहे, असेही तुलसी पुढे म्हणाले. सरकारला चर्चेमध्ये रस नसून त्यामुळेच सरकार विरोधकांना समजून सांगण्याचे कष्ट घेत नाही, असा आरोपही तुलसी यांनी यावेळी केला. नोटाबंदीच्या मुद्यावरून दोन्ही सभागृहाचे कामकाज सातत्याने तहकूब होत आहे.

Web Title: Those against note ban doesn't mean they favour black money: K T S Tulsi