जगन्नाथाचा स्नानविधी पुरीत पारंपरिक पद्धतीने

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

पुरी : देवस्नान पौर्णिमेनिमित्त जगन्नाथाच्या स्नानविधीच्या कार्यक्रमासाठी पुरीच्या बडादांडावर (मोठा रस्ता) भाविकांचा महापूर लोटला होता. जगन्नाथाबरोबर बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तीही असतात.

स्कन्द पुराणानुसार, हा स्नानविधी म्हणजे प्रख्यात रथ यात्रेचा प्रारंभ असतो. राजा इंद्रद्युम याने या लाकडी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली आणि स्नानविधी सुरू केला. 

पुरीच्या श्रीमंदिरातील स्नानवेदीवर हा विधी झाला. सेवेकऱ्यांनी मूर्ती आणल्यावर प्रथम सुदर्शनाचा स्नानविधी झाला, नंतर बलभद्र, जगन्नाथ आणि सुभद्रा यांचा स्नानविधी झाला.

तत्पूर्वी, मंगल अलाती, मैलम लागी, तडपा लागी, अधरपोचा, होम, सूर्यपूजा आणि द्वारपाल पूजेचे कार्यक्रम झाले. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. 

Web Title: Thousands witness snana purnima at Puri Jagannath Temple

टॅग्स