जीवाला धोका असल्याने भारतात परतणार नाही : नीरव मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

''माझ्या जीवाला भारतामध्ये धोका आहे. त्यामुळे मी भारतात परतण्यास इच्छुक नाही. होळीच्या दिवशी माझ्या पुतळ्याचे दहन केले होते. ते मी पाहिले. विविध माध्यमातून मला वारंवार धमकावले जात आहे. त्यामुळे भारतात माझ्या जीवाला धोका असून, भारत माझ्यासाठी सुरक्षित जागा नाही''.

- नीरव मोदी

नवी दिल्ली : भारतात परतण्यास मी इच्छुक नाही. कारण तेथे माझ्या जीवाला धोका आहे, अशा शब्दांत पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने भारतात परतण्यास नकार दिला आहे. नीरव मोदीचे हे म्हणणे त्याच्या वकिलाने न्यायालयात मांडले आहे.   

पीएनबीमध्ये सुमारे 13 हजार 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच हे दोघांनी भारताबाहेर पलायन केले. त्यांना भारतात परत आणण्यासाठी ईडीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता नीरव मोदीने त्याच्या वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले. ''माझ्या जीवाला भारतामध्ये धोका आहे. त्यामुळे मी भारतात परतण्यास इच्छुक नाही. होळीच्या दिवशी माझ्या पुतळ्याचे दहन केले होते. ते मी पाहिले. विविध माध्यमातून मला वारंवार धमकावले जात आहे. त्यामुळे भारतात माझ्या जीवाला धोका असून, भारत माझ्यासाठी सुरक्षित जागा नाही'', असे नीरव मोदीने सांगितले. 

दरम्यान, कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यालाही भारतात परत आणण्यासाठी ईडीकडून प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: The threat to my life in India says Neerav Modi