Threat To PM Modi : प्रजासत्ताक दिनी मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Threat To PM Modi
Threat To PM Modi : प्रजासत्ताक दिनी मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

प्रजासत्ताक दिनी PM मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

सुरक्षा यंत्रणांच्या गोपनीय अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दहशहतवाद्यांच्या संभाव्य कटाबद्दल गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागला आहे. नऊ पानांच्या गोपनीय अहवालातून ही बाब समोर आली आहे. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. त्यामुळे आता देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान असणार आहे. (Threat to PM Modi on Republic Day)

हेही वाचा: ऐनवेळी टेलिप्रॉम्पटर बंद; PM मोदींचा उडाला गोंधळ; काँग्रेसची टीका

भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला आशियायी देशांतील मोठ्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये कजाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांच्या मान्यवरांचा समावेश असणार असल्याची शक्यता आहे. या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या क्षेत्राबाहेरील गटांकडून हा कट रचला जाऊ शकतो. या गटांचं उद्दिष्ट मोठ्या पदावरील मान्यवरांना लक्ष्य करणं आणि सार्वजनिक मेळावे, महत्त्वपूर्ण आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणे हा आहे.

हेही वाचा: PM मोदींमुळे चर्चेत आलेलं 'टेलिप्रॉम्पटर' म्हणजे नेमकं असतं तरी काय?

या गोपनीय अहवालात लष्कर-ए-तोयबा, द रेझिस्टन्स फोर्स, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिज्बुल-मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी गटांचा या संभाव्य कटामागे हात असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानमधील खलिस्तानी गट पंजाबमध्ये पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया सुरू करण्यासाठी केडरला एकत्र करत आहेत. ते पंजाब आणि इतर राज्यांमध्ये हल्ल्यांची योजना आखत असल्याची देखील माहिती यंत्रणांना मिळाली आहे. दरम्यान, देशाच्या ७५ व्या प्रजासत्तादिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा यंत्रणांनी तयारी सूरू केली असून, यावेळी कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचं देखील आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

Web Title: Threat To Pm Modi Ntelligence Input Has Indicated Security Alert Indicates Terror Plot 75th Republic Day Of India Security Agencies Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Republic DayNarendra Modi