..तर तिरडी तयार ठेवा; RSS पदाधिकाऱ्याच्या हत्येचा शोध घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धमकी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

..तर तिरडी तयार ठेवा; RSS पदाधिकाऱ्याच्या हत्येचा शोध घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धमकी!

नवी दिल्ली - केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते श्रीनिवासन यांच्या कथित हत्येतील तपास अधिकाऱ्याने आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा दावा केला आहे, पोलिसाने सांगितले की, तपास अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फोन करणाऱ्याने त्याला म्हटलं की, चौकशीमुळे आपल्याला त्रास झाला आहे.

दरम्यान तपास सुरू ठेवलाच तर पलक्कड सोडण्यापूर्वी परिणाम भोगावे लागतील. तसेच तपास अधिकाऱ्याने तपास केल्यास तिरडी तयार ठेवावी, अशी धमकीही दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 34 आरोपींना अटक करण्यात आली असून हे सर्व जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित आहेत. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात (पीएफआय) नेता सुबैर यांची हत्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता श्रीनिवासन याची हत्या करण्यात आली होती.

१५ एप्रिल रोजी एलुपल्ली पलक्कड जिल्ह्यात पीएफआयचा कार्यकर्ता असलेल्या सुबेरची हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून १६ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष तपास पथके स्थापन केली होती.

अलीकडेच केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तसेच अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मिळालेल्या माहितीनुसार, "पीएफआयला परदेशातून भरीव निधी मिळतो. केंद्रीय एजन्सींना असेही आढळले की "पीएफआय परदेशातून निधी गोळा करून बेकायदेशीर पद्धतीने त्याचा भारतात वापर करते.

टॅग्स :KeralacrimeRSS