
अनेक रेल्वे स्थानकांसह मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
पुन्हा एकदा रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याच्या धमक्या (Threat) आल्या आहेत. स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे सांगून धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने २१ मे रोजी मुरादाबाद-हरिद्वारसह अनेक रेल्वे स्थानकांना (railway stations) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. (Threats to blow up CMs including railway stations)
मुरादाबाद, बरेली आणि हरिद्वार रेल्वे स्थानकांसह अनेक स्थानकांना रविवारी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यासंदर्भात रुडकीच्या स्टेशन अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. पत्रात हरिद्वारच्या अनेक धार्मिक स्थळांना आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. स्टेशन अधीक्षकांनी आरपीएफ आणि जीआरपी तसेच मुरादाबाद डीआरएम अजय नंदन यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.
हेही वाचा: मंत्र्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप; जिवाला धोका असल्याची तक्रार
रुडकी स्टेशनचे अधीक्षक एलके वर्मा यांच्या नावाने रविवारी एक अंतर्देशीय पत्र आले. पत्रात २१ मे रोजी हरिद्वार, लक्सर, रुडकी, डेहराडून, ऋषिकेश, काठगोदाम, मुरादाबाद आणि बरेली ही स्थानके (railway stations) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Threat) देण्यात आली. तसेच २३ मे रोजी हरिद्वारचे धार्मिक स्थळ मनशा देवी, हरकी पैडीलाही लक्ष्य करणार आहे. तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने (bomb blast) उडवणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
स्टेशन अधीक्षक रुडकी यांनी धमकीच्या पत्राची प्रत डीआरएमला व्हॉट्सॲपवर पाठवली आहे. त्याचवेळी जीआरपी आणि आरपीएफलाही या पत्राची माहिती देण्यात आली. पत्राची गांभीर्याने दखल घेत रेल्वेने तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पत्रावरील लिखाण आणि पोस्ट ऑफिसचे शिक्के तपासण्यात जीआरपी मग्न आहे. याआधीही अनेकदा रेल्वे स्टेशन बॉम्बने (bomb blast) उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत.
Web Title: Threats To Blow Up Cms Including Railway Stations Jaish E Mohammed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..