कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तीन अल्पवयीन मुले ताब्यात  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने अल्पवयीन मुले अत्याचार लैंगिक शोषणाची बळी ठरू नयेत म्हणून ही कारवाई स्कॅन इंडिया या समाजसेवी संस्थेच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. 

गोवा - कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी मेरशी येथील 'अपना घर'मध्ये केली आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने अल्पवयीन मुले अत्याचार लैंगिक शोषणाची बळी ठरू नयेत म्हणून ही कारवाई स्कॅन इंडिया या समाजसेवी संस्थेच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांध्ये तीन अल्पवयीनांपैकी दोन मुलगे हे अनुक्रमे 14 व 15 वर्षाचे असून ते उत्तर प्रदेश येथील आहेत. 14 वर्षाच्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आले असून ती कर्नाटकची आहे. या मुलानी त्यांचे आईवडील कोठे आहेत, याची माहिती उघड केली नसून त्याचा शोध घेण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर फेरीवाले तसेच भिकाऱ्यांना फिरण्यास व अल्पवयीनांनाही पालकांशिवाय फिरण्यास बंदी आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना वस्तू विक्री करणारे अल्पवयीन हे अत्याचाराचे व लैंगिक शोषणाचे शिकार होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले.

Web Title: Three boys caught at kalangut seaface