जेएनयूतील हिंसाचारप्रकरणी तीन गुन्हे दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी दिल्ली : वादग्रस्त "लव्ह जिहाद' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी शुक्रवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्यावरून दिल्ली पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडे एकूण 13 तक्रारी आल्या होत्या त्याची पडताळणी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी अध्यक्ष मोहित पांड्ये याने केलेल्या तक्रारीनंतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी एक तक्रार ही पांडेच्या विरुद्धच आली आहे. विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक योगेशकुमार याने ही तक्रार दिली असून, त्यात म्हटले आहे की मोहित पांडेने वेगाने गाडी चालविली. त्यात तो जखमी झाला. त्याचप्रमाणे तिसरी तक्रार ही एका विद्यार्थिनीने केली असून त्यात म्हटले आहे की, वेगाने गाडी चालविल्याने मी जखमी झाले आहे. शुक्रवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विवेकानंद विचार मंच आणि ग्लोबल इंडिया फाउंडेशनच्या वतीने "इन द नेम ऑफ लव्ह गॉडसॉन्ली ऑफ गॉडस्‌ ऑन कन्ट्री' या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.

Web Title: Three cases filed of JNU violence