सिलचर-तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला भीषण आग

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

- रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु.

नवी दिल्ली : सिलचर-तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला आज (रविवार) भीषण आग लागली. या रेल्वेच्या तीन डब्यांना आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस सिलचरहून निघण्यापूर्वी साफसफाईसाठी उभी होती. यादरम्यान काही वेळातच या रेल्वेतून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात आले. या एक्स्प्रेसच्या एकाच डब्याला आग लागली होती. त्यामुळे या डब्यातून धूर बाहेर येत होता. मात्र, काही वेळाने ही आग पसरली आणि आणखी दोन डब्यांना लागली. या रेल्वेला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या रेल्वेला आग लागल्याची माहिती मिळताच 'स्टेट डिझास्टर रिलिफ फोर्स' (एसडीआरएफ) आणि सिलचर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three coaches of Silchar Thiruvananthapuram Express Fire

टॅग्स