कोरोनाच्या संसर्गाने मध्यमवर्गातील तीन कोटी लोक गरिबीच्या खाईत

Poor
Poor

‘प्यू रिसर्च सेंटर’चा अंदाज; कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील बेरोजगारांची संख्या वाढली
नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाने अवघ्या देशालाच आर्थिक अनिश्‍चिततेच्या गर्तेमध्ये ढकलले असून मागील वर्षभरात ३ कोटी २० लाख लोक मध्यम वर्गातून बाहेर फेकल्या गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. बेरोजगारी वाढल्याने लोकांच्या आर्थिक विपन्नावस्थेमध्ये भर पडल्याचेही दिसते. ज्यांचे रोजचे उत्पन्न हे १० ते २० डॉलरदरम्यान (साधारणपणे ७०० ते १४०० रुपये) होते अशा देशांतील मध्यमवर्गीयांची संख्या ३ कोटी २० लाखांनी घटली आहे, असे अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाकाळात देशातील मध्यमवर्गीयांची संख्या ६ कोटी ६० लाखांपर्यंत खाली आली असून संसर्ग येण्यापूर्वी ती ९ कोटी ९० लाख एवढी होती. कोरोनाचा भारताला जबर फटका बसणार असून देशातील मध्यमवर्गाचा आकार लक्षणीयरित्या घटणार आहे.  चीनच्या तुलनेमध्ये आपल्याकडे गरिबीही  वाढणार आहे, असे प्यूच्या संशोधकांनी म्हटले आहे. यासाठी संशोधकांनी जागतिक बँकेने आर्थिक वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाचा हवाला दिला आहे. 

देशात २०११ ते २०१९ या काळामध्ये ५ कोटी ७० लाख लोक नव्याने मध्यमवर्गात समाविष्ट झाले होते. मागील वर्षी जानेवारीमध्ये जागतिक बँकेने भारत आणि चीनचा आर्थिक विकास दर हा अनुक्रमे ५.८ टक्के आणि ५.९ टक्क एवढा राहील असा अंदाज व्यक्त केला होता. 

संसर्गामुळे मंदी
चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेकडून सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये भारताचा विकासदर ९.६ टक्क्यांनी आकुंचन पावेल, तर चीनचा विकासदर दोन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. ज्यांचे उत्पन्न दिवसाला २ डॉलरपेक्षाही (जवळपास १४५ रुपये) कमी आहे अशांची देशातील संख्या ७ कोटी ५० लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या  संसर्गाने आणलेल्या मंदीचा त्यांना जबर तडाखा बसला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com