दाऊदच्या मुंबईतील तीन मालमत्तांचा लिलाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या तीन मालमत्तांसाठी सर्वाधिक बोली लावल्याची माहिती मिळत आहे. रौनक अफ्रोज हॉटेलसाठी 4.53 कोटींची, शबनम गेस्ट हाऊससाठी 3.52 कोटींची तर दमरवाला बिल्डिंगसाठी 3.53 कोटींची बोली लावण्यात आल्याची सांगितले जात आहे.

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तीन मालमत्तांचा लिलाव आज (मंगळवार) करण्यात आला. या लिलावप्रक्रियेचे शासनाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन केले. या लिलावातून 11.58 कोटींचा महसूल मिळाला असल्याची माहिती मिळत आहे.

अर्थमंत्रालयाने दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव 'तस्कर आणि परदेशी एक्सचेंज कायद्यां'तर्गत करण्यात आला आहे. यामध्ये दाऊदच्या तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. यामध्ये त्याचे 'दिल्ली झायका' नावाने ओळखल्या जाणाऱ्या हॉटेल रौनक अफ्रोज, शबनम गेस्ट हाऊस आणि दामरवाला इमारतीतील सहा खोल्यांचा लिलाव करण्यात आला. 

सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या तीन मालमत्तांसाठी सर्वाधिक बोली लावल्याची माहिती मिळत आहे. रौनक अफ्रोज हॉटेलसाठी 4.53 कोटींची, शबनम गेस्ट हाऊससाठी 3.52 कोटींची तर दमरवाला बिल्डिंगसाठी 3.53 कोटींची बोली लावण्यात आल्याची सांगितले जात आहे.

Web Title: Three Dawood Ibrahim properties sold to Saifi Burhani Upliftment Trust