कोची शिपयार्डात अपघात; तीन मृत्युमुखी

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या जहाजावर आणखी दोन जण अडकल्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे

कोची - कोची शिपयार्ड येथे दुरुस्त केल्या जात असलेल्या एका जहाजावर आग लागल्याने तीन जण ठार झाल्याची माहिती येथील प्रवक्‍त्याने दिली आहे.

या जहाजावर अडकलेल्या इतर 11 जणांची सुटका करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या जहाजावर आणखी दोन जण अडकल्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले आहे.

या प्रकरणी अधिक माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.

Web Title: Three die in fire on ship under repair at Cochin Shipyard

टॅग्स