आसाम: रेल्वेसमोर आल्याने तीन हत्तींचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

गुवाहाटी (आसाम) - वेगात असलेल्या रेल्वेच्या समोर आल्याने आज (शनिवार) पहाटे झालेल्या अपघातात तीन हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. या अपघातामुळे या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

मध्य आसाममधील नागाव जिल्ह्यात कामपूर जवळ ही घटना घडली. जंगलातील हत्ती रेल्वे रूळाजवळ आल्याने हा अपघात घडला. दोन हत्तींचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर अन्य एक हत्ती नंतर मरण पावला. घटनेनंतर स्थानिकांनी वनविभागाला कळविले. हत्तींच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात वनखाते अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. मृत हत्तींना घटनास्थळाजवळच पुरण्यात येत आहे.

या अपघातामुळे राजधानी एक्‍स्प्रेस, कापरूप एक्‍स्प्रेस, ब्रह्मपुत्रा एक्‍स्प्रेस आणि इतर काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच डिसेंबर रोजी अशीच एक घटना घडली होती. मध्य आसाममध्येच घडलेल्या त्या घटनेत तीन हत्तींचा रेल्वे मृत्यु झाला होता.

Web Title: Three elephants killed after being hit by train