

Nepal Flood Tragedy Dead Body Claimed by Three Families DNA Report Awaited as Identification Remains a Major Challenge
sakal
गाल्छी (नेपाळ): छायाचित्र हातात घेतले...चेहरा न्याहाळला... कपाळ, ओठ, कान, दात, हात, प्रत्येक खूण बारकाईने तपासली. ‘हा आपलाच माणूस आहे,’ असा विश्वास मनाशी धरून कुटुंबीयांनी रुग्णालयातील मृतदेहांकडे पाहिले. मात्र, पोखराच्या सरकारी रुग्णालयातील १००३ क्रमांकाच्या मृतदेहासमोर तीन कुटुंबे उभी ठाकली. तिघांनाही वाटत होते, ‘हा’ आपल्याच कुटुंबातील आहे.