
पश्चिम बंगालमध्ये भाजपला पुन्हा एकदा धक्का बसलाय.
पश्चिम बंगालात भाजपला झटका; BJP खासदाराच्या तीन सहकाऱ्यांचा टीएमसीत प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला (BJP) पुन्हा एकदा धक्का बसलाय. लोकसभा खासदार अर्जुन सिंह (Arjun Singh) यांचे तीन सहकारी रविवारी टीएमसीत (Trinamool Congress Party) दाखल झाले. भाटपारा नगरपालिकेचे अध्यक्ष सौरव सिंह आणि माजी आमदार सुनील सिंह यांचाही यात सहभाग आहे. सौरव सिंह यांना भाजपनं नागरी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.
सुनील सिंह (Sunil Singh) नोआपारा येथून आमदार राहिले आहेत. नोआपारा येथील महापालिकेच्या निवडणुकीतही (Municipal election) त्यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. सुनील सिंह यांच्यासह त्यांचा मुलगा आदित्य सिंह आणि अर्जुन सिंह यांचा पुतण्या सौरव सिंह यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर हे तिघंही टीएमसीत दाखल झाले. एकीकडं भाजपचे अनेक नेते तृणमूलमध्ये (TMC) सामील झालेत, तर दुसरीकडं टीएमसीमधील अंतर्गत कलहाच्या बातम्याही समोर येत आहेत.
हेही वाचा: नवा भारत 'शरियत'नुसार नव्हे, तर संविधानानुसार चालेल : CM योगी
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यातील संघर्षाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. या वादानंतर ममता बॅनर्जी यांनी 20 सदस्यीय राष्ट्रीय समितीची घोषणा केलीय. ममता बॅनर्जी यांचे पक्षावर नियंत्रण वाढवण्यासाठी आणि जुन्या-नव्या नेत्यांमधील संघर्ष रोखण्यासाठी ही समिती काम करेल. समितीच्या पदाधिकाऱ्यांची नावं ममता बॅनर्जी नंतर जाहीर करणार असून त्यानंतर ही यादी निवडणूक आयोगाकडं पाठवली जाईल, असं सांगण्यात येतंय.
Web Title: Three Friends Of Lok Sabha Mp Arjun Singh Join Trinamool Congress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..