बंगळूर: एक कोटीपेक्षा अधिक किंमतीची बनावट घड्याळे जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

बंगळूर - कॉपीराईट कायद्याचा भंग करत नामवंत कंपन्यांची बनावट घड्याळे विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक किंमतीची बनावट घड्याळे जप्त करण्यात आली आहे.

मे. युनायटेड ओव्हरसीज ट्रेड मार्कचे प्रतिनिधी प्रमोद कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आज कारवाई केली. यावेळी त्यांनी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रॅडो, हुबलॉट, तीस्सोट, ओमेगा आदी कंपन्यांच्या बनावट घड्याळी आढळून आल्या. कुमार यांच्या कंपनीकडे या सर्व ब्रॅण्डच्या विक्रीचा अधिकृत परवाना आहे. बनावट घड्याळे विक्री करून ताब्यात घेतलेले तिघे जण वेगवेगळ्या दुकानांमध्ये त्यांची विक्री करत होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये अब्बार, एम.बी. शाफ्युला, खालीम यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल 1.07 कोटींची बनावट घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. हे तिघे चेन्नई आणि मुंबई येथून बनावट घड्याळे तीन ते चार हजार रुपयांत खरेदी करत होते आणि सात ते आठ हजारात विक्री करत होते. या प्रकरणी पोलिस कॉपराईट कायद्यानुसार कारवाई आणि तपास करत आहेत.

कॉपीराईट कायद्यांतर्गत कोणतेही उत्पादन, संगीत, नाटक किंवा कलाकृतीचे हक्क मूळ निर्मात्याकडे असतात. निर्मात्याच्या परवानगीशिवाय कॉपीराईट असलेल्या बाबींचा उपयोग केल्यास तो कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा ठरतो.

Web Title: Three held, Rs 1.08 Cr worth fake watches seized