पालघरमध्ये दुभाजकाला धडकून मोटारीचा अपघात; तीन ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळील चारोटी नाक्‍याजवळ मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर अन्य एक जण जखमी झाले आहेत.

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळील चारोटी नाक्‍याजवळ मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हाला हा अपघात झाला. वेगात असलेली इनोव्हा पालघरमधून पुढे जात असताना चारोटी नाक्‍याजवळील रस्ता दुभाजकाला जोरात धडकून रस्त्याच्याविरुद्ध बाजूला पडली. हा अपघात इतका भीषण होता की तीन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रचंड वेगात असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण मिळविता आले नसावे अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघात झाला तेव्हा सर्व प्रवाशी झोपले होते, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Three killed on Mumbai-Ahmedabad highway as car jumps divider