JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

JPSC Members Resignation: रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेपीएससीच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. अजिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
JPSC Members Resignation

JPSC Members Resignation

ESakal

Updated on

जेपीएससी-जेएसएससीमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झारखंड लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. सीआयडीकडून समन्स मिळाल्यानंतर जेपीएससीचे तीन सदस्य अजिता भट्टाचार्य, अनिमा हंसदा आणि जमाल अहमद यांनी राज्यपालांना आपले राजीनामे पाठवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com