शोपियाँत चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

army
army

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील केलर क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरून कारवाई केली. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही. परिसरात अद्याप काही दहशतवादी लपल्याची शक्यता असून, हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांकडून शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

दहशतवाद्यांविरोधात या मोहिमेत भारतीय लष्करासह सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांचाही सहभाग आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com