सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी आणखी तिघे अटकेत

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी दिल्ली: सीबीएसईच्या 12 वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने हिमाचल प्रदेशमध्ये उना जिल्ह्यात कारवाई करत एक शिक्षक, लिपिक आणि शाळेच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली. शिक्षकाचे नाव राकेश असून, लिपिकाचे नाव अमित आणि तिसऱ्या आरोपीचे नाव अशोक आहे. तो चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. परीक्षेच्या काळात शिक्षक अशोक हा केंद्रप्रमुख म्हणून काम करत होता.

सीबीएसईच्या बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर या तिघांनी फोडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघांनी हाताने लिहिलेला पेपर लीक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा पेपर दोन दिवस अगोदरच फुटला होता. मात्र, तिघांवर करण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. या तिघांच्या चौकशीतून पेपरफुटीप्रकरणी आणखी माहिती उघड होण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात 26 मार्चला 12 वीचा अर्थशास्त्राचा पेपर झाला. मात्र, हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आल्याने सीबीएसईने परीक्षा रद्द केली. दरम्यान, सीबीएसईने पेपर फुटल्याने रद्द केलेला 12 वीचा अर्थशास्त्राचा पेपर आता 25 एप्रिलला होणार आहे.

Web Title: Three others arrested in the CBSE paper leack case