Noida Expressway : दोन बसची समोरासमोर जोरदार धडक; 3 प्रवासी जागीच ठार, 20 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Greater Noida Expressway Road Accident

पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं आहे.

Noida Expressway : दोन बसची समोरासमोर जोरदार धडक; 3 प्रवासी जागीच ठार, 20 जण जखमी

ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे'वर (Greater Noida Expressway) रविवारी सकाळी दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार, तर 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ग्रेटर नोएडा येथील नॉलेज पार्कजवळ नोएडा एक्सप्रेसवेवर दोन बस एकमेकांना धडकल्या. या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचं कळतंय. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवारांचा इशारा

जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताचा तपास सुरू केला आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय, अपघाताचं कारणही सध्या समजू शकलं नाही.

हेही वाचा: Tawang Clash : शत्रूंच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत; संरक्षण मंत्रालयाचा चीनसह पाकिस्तानला इशारा