दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक

वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

दिल्ली पोलिसांनी सोमवारी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश मिळवले. दिल्ली पोलिसांनी आसाममधील गोलपरा येथून तीन दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक केले आहे. 
 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सोमवारी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश मिळवले. दिल्ली पोलिसांनी आसाममधील गोलपरा येथून तीन दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक केले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दिल्ली पोलिस आणि आसाम पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केल्याची माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली. मुकदिर इस्लाम, रणजीत अली आणि जमिल लुइत असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्‍यांचे नाव असून त्यांचा इसिसशी संबंध असण्याची शक्‍यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three terror suspects arrested in delhi