भारतावर हल्ल्यासाठी तीन संघटना एकत्र

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानच्या लष्कर व "आयएसआय'च्या मदतीने लश्‍करे तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैशे मोहम्मद या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्‍मीरसह भारताच्या अन्य काही भागांत दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानच्या लष्कर व "आयएसआय'च्या मदतीने लश्‍करे तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैशे मोहम्मद या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्‍मीरसह भारताच्या अन्य काही भागांत दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

एका वृत्तसंस्थेने या बाबत एक वृत्त दिले असून, या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांमध्ये मागील आठवड्यात पुलवामा येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी दहशतवादी कारवायांसंदर्भात जबाबदाऱ्या आपसांत वाटून घेतल्या आहेत.

विरोधकांच्या खेळीने पुण्यात आलीय रंगत

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, "जैशे'च्या दहशतवाद्यांना राष्ट्रीय महामार्गावर हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर "लष्कर'च्या दहशतवाद्यांना अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सांगितले असून हिजबुल मुजाहिदीनवर काश्‍मीर खोऱ्यात "बंद' घडवण्याबरोबरच पोलिस व नेत्यांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three terrorist organizations plan for attack on india