घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मारले

पीटीआय
गुरुवार, 7 जून 2018

भारतीय लष्कराने आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला. माछील सेक्‍टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले. 
 

श्रीनगर - भारतीय लष्कराने आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला. माछील सेक्‍टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले. 

सीमेवर गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलाला प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील माछील सेक्‍टरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे आढळून आले. त्या वेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले. माछील परिसरात अद्याप तपास मोहीम सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. 

दहशतवाद्यांकडून घातपाताचा प्रयत्न : मेहबुबा मुफ्ती 
रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने विशेष मोहीम थांबवलेली असताना दहशतवाद्यांच्या कारवाया चिंताजनक असल्याचे मत मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. ट्‌विट करताना मेहबूबा म्हणाल्या की, केंद्र सरकारचा अभियान थांबवण्याचा निर्णय जम्मू काश्‍मीरच्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरला होता. मात्र दहशतवाद्यांच्या घातपाती कारवाया पाहता शांतता प्रक्रियेत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. घातपाती कारवायातून हाती काहीच लागणार नाही आणि त्याची जाणीव लवकरच होईल, अशी आशा मेहबूबा यांनी व्यक्त केली. रमजानचा महिना सुरू झाल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात घडलेल्या दहशतवादी घटनांचा संदर्भ देत मेहबूबा यांनी मत व्यक्त केले. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ले केले होते. तसेच गुरुवारपासून ते आतापर्यंत डझनभर ग्रेनेड हल्ले झाले आहेत. 

Web Title: three terrorists killed in jammu and kashmir