भारतीय जवानांकडून काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
Monday, 27 April 2020

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम परिसरात रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत भारतीय लष्करातील एक जवान मात्र, जखमी झाला आहे. याबाबतचे वृत एएनआयने दिले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम परिसरात रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत भारतीय लष्करातील एक जवान मात्र, जखमी झाला आहे. याबाबतचे वृत एएनआयने दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चकमकीदरम्यान काही दहशतवादी पळून गेले असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे सर्वजण कुलगामच्या लोवरमुंडा परिसरात लपून बसले असल्याची प्राथमिक माहिती सैनिकांकडून देण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला असून सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे. काल (ता. २६) रात्री गुडर येथे या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. कालच्या कारवाईत लष्करासह सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनीही सहभाग घेतला होता.

काल (ता. २६) संध्याकाळी अस्थल आणि चेहलान परिसरात राष्ट्रीय रायफल्सचे जवान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अचानकपणे हल्ला चढवला. भारतीय जवानांनी तात्काळ हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांचे विशेष कृती दल पथकही त्याठिकाणी मदतीला आले. या दोन्ही दलांनी मिळून रात्री उशीरापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three terrorists neutralised in an ongoing operation in Kulgam