एटीएम सुरळीत होण्यासाठी तीन आठवडे लागणार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नव्या नोटांच्या आकारामुळे एटीएम यंत्रांमध्ये समस्या उद्‌भवल्याचे आज केंद्र सरकारने प्रथमच मान्य केले. देशभरातील किमान दोन लाख एटीएम यंत्रांमध्ये आवश्‍यक फेरबदल करण्यासाठी किमान 2 ते 3 आठवडे लागतील, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितले.

बॅंका व एटीएम केंद्रांवर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत उसळलेल्या गर्दीला हाताळण्यात सरकारी बॅंका कमी पडत असल्याच्या वृत्तानंतर जेटली यांनी आज देशभरातील वरिष्ठ बॅंक अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव व अन्य वरिष्ठ बाबू हजर होते. जेटली यांची तीन दिवसांतील ही चौथी पत्रकार परिषद होती. मात्र रांगांमध्ये दिवसरात्र उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागणाऱ्या लोकांचा संयम आता सुटत चालला आहे, हा प्रश्‍न जेटली यांनी सरळसरळ टाळला. लोकांचा पैसा सुरक्षित असल्याचे सांगणाऱ्या जेटली यांनी हक्काच्या पैशासाठीही लोकांना वणवण का फिरावे लागत आहे, या प्रश्‍नाला बगल दिली.

जेटली म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेकडे पुरेसे व भरपूर चलन आहे. आगामी काही दिवस लोकांना काही गैरसोय होऊ शकते. एटीएम केंद्रांत नव्या नोटांसाठीची तांत्रिक रचना करण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील. लोकांनी अफवा पसवरू नयेत.

Web Title: Three weeks to make ATM