

Datia Gangrape News
ESakal
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपींनी त्या मुलीला भेटण्याच्या बहाण्याने फसवून तिला गुंगीचे औषध देऊन एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.