
लसीकरणाबाबत भ्रम पसरवणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा; मोदींचं आवाहन
मुंबई : देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांचं लसीकरण झालेलं असतानाही त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर काहीजण लसीकरणाबाबत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे प्रयत्न हाणून पाडा, असं आवाहन पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत केलं. देशातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. (Thwart attempts to spread illusions about vaccination PM Modi appeal to all CM)
हेही वाचा: मुंबै बँक हातून निसटल्यानंतर प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले, "अनेकदा आपल्याला अशा अफवा ऐकायला मिळत की लसीकरणानंतरही संसर्ग होतोय तर त्याचा काय फायदा? मास्कबाबतही अशाच अफवा उठतात. अशा अफवांना उत्तर देण्याची खूप गरज आहे. कोरोनाच्या या लढाईत आपल्या आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. आता आपल्याजवळ कोरोशी लढाईचा दोन वर्षांचा अनुभव आहे. देशव्यापी तयारी देखील आहे. सामान्य लोकांचे काम-धंदे, आर्थिक बाबींचं कमीत कमी नुकसान व्हावं. अर्थव्यवस्थेची गती कायम राहिली पाहिजे. कोणतीही रणनिती बनवताना आपण या बाबी कायम लक्षात ठेवाव्यात"
होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार व्हावेत
यासाठी स्थानिक कन्टेन्मेंटवर जास्त भर देणं गरजेचं आहे. जिथून जास्त प्रकरणं येत आहेत. जिथं जास्तीत जास्त वेगानं टेस्टिंग करण्यात याव्यात. याशिवाय होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार व्हावेत. यासाठी होम आयसोलेशनशी संबंधीत गाईडलाईन्स जाहीर केल्या जाव्यात. होम आयसोलेशनदरम्यान ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट जितकं चांगलं होईल तितकचं रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, असा सल्ला यावेळी मोदींनी दिला.
हेही वाचा: Resignation: टॉप IT कंपन्यांमध्ये 'Exit' चे प्रमाण 15 ते 20 टक्के
पुढच्या व्हेरियंटसाठी राज्यांनी तयार रहावं
केंद्रानं टेलिमेडिसिनमध्ये खूप सुविधा विकसित केल्या आहेत. याचाही जास्तीत जास्त वापर केल्यास त्याचा कोरोना रुग्णांना मदत होईल. यासाठी केंद्र सरकार कायमचं राज्यांच्या पाठिशी उभं आहे. कोरोना हारवण्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा लागेल. ओमिक्रॉनशी दोन हात करताना भविष्यात येणाऱ्या दुसऱ्या व्हेरियंटसाठी देखील आपण तयारी सुरु करायला हवी, असं आवाहनही त्यांनी केलं.
आयुर्वेदिक काढ्यावर भर द्या
देशात जी आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. यामध्ये काढ्यासारख्या गोष्टी देखील परिणामकारक आहेत. याला कोरोनावरील औषध म्हणून घ्यायचं नाही पण त्याचा प्रतिकारशक्ती राखण्यासाठी चांगला उपयोग होतो. देशवासियांनाही माझं आवाहन आहे की, या घरगुती गोष्टींची तुम्हाला चांगली मदत होऊ शकेल. त्यावरही सर्व राज्यांनी भर द्यायला हवा.
Web Title: Thwart Attempts To Spread Illusions About Vaccination Pm Modi Appeal To All Cm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..