मुंबै बँक हातून निसटल्यानंतर प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

गेल्या सहा ते सात वर्षांपासून दरेकर यांनी मुंबै बँकेची सूत्र सांभाळली. मध्यंतरी उमेदवारी अर्जात मजूर अशी ओळख दिल्यानं सहकार विभागानं त्यांना नोटीसही पाठवली होती.
Pravin Darekar
Pravin DarekarSakal

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) अध्यक्ष आणि उपाध्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमदेवार प्रसाद लाड यांचा पराभव केला. त्यामुळं मुंबै बँक प्रवीण दरेकर यांच्या हातून निसटली आहे. यानंतर दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारनं हा डाव खेळल्याचं म्हटलं आहे. (Praveen Darekar first reaction after loosing from Mumbai Bank)

Pravin Darekar
NCPचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष; तर उपाध्यक्षपद भाजपकडे

दरेकर म्हणाले, "निवडणुकीपूर्वी सरकार म्हणून पुढे येत तिन्ही पक्षांनी एकत्र ही निवडणूक लढवली. मी विरोधी पक्ष नेता असल्यानं आणि माझ्या हातात बँकेचं नेतृत्व असल्यानं महाविकास आघाडीनं एकत्र येऊन ही खेळी केली. यामध्ये आम्हाला उपाध्यक्ष पदासाठी सारखीच दहा-दहा मतं मिळाली आहेत. त्यामुळं या निवडणुकीत फार फरक आहे असा भाग नाही. फक्त अध्यक्षपदचं २ मतांसाठी गेलं आहे. भाजपचे विष्णू भुमरे यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं. नाहीतर ही निवडणूक टाय झाली असती आणि अध्यक्षही टॉसवर निवडून आला असता" पराभव होत असतात आणि सूत्रे नव्या लोकांकडं जात असतात. त्यामुळं यापुढे बँकेच्या उत्कर्षासाठी योग्य ते योगदान देऊ, असंही यावेळी दरेकर म्हणाले.

मत कशामुळं फुटली?

अजितदादा पवार यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष लक्ष घातलं आणि सरकारी यंत्रणेकडून दबाव आणल्यानं हा निकाल आला. फुटलेली व्यक्ती दोन दिवसापासून गायब होती. त्यामुळं त्याचवेळी याची कल्पना मला आली होती. मला लक्ष करण्याचा प्रयत्नही झाला. जेवढ्या चौकशा अस्तित्वात आहेत त्या सर्व लावल्या, नोटीसा पाठवल्या. अपात्र ठरवलं गेलं इतर काहीच बाकी ठेवलं नाही. मतदारांच्या संस्थांनाही सरकारनं नोटीसा पाठवल्या, असंही दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Pravin Darekar
अखेर नितेश राणे प्रकटले! थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लावली हजेरी

अर्ज भरताना मजूर अशी ओळख दाखवल्यानं मध्यंतरी दरेकरांना सहकार विभागानं नोटीसही पाठवली होती. त्याचाच हा परिणाम होता का? या प्रश्नावर उत्तर देताना दरेकर म्हणाले, "मी दोन ठिकाणांहून निवडणून आलो होतो. त्यानंतर मी संबंधीत आरोप झालेल्या मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. त्यामुळं तो विषय आत संपुष्टात आला आहे"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com