'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

गंभीर घटनांमध्येच फाशी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत डिसेंबर, 2012 ला धावत्या बसमध्ये एका मेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामुळे देशात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरत तीव्र निषेध केला. यातील दोषींना फाशीची शिक्षा मिळणार हे निश्चित झाले आहे. मात्र, त्यांना फाशी देण्यासाठी तिहार कारागृह प्रशासनाकडे जल्लाद उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अनेक बलात्कार प्रकरणं समोर आली आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये डॉक्टर असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या निर्घृण प्रकारानंतर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर या दोषींना फाशी देण्यासाठी जल्लाद नसल्याचे उघड झाले आहे. यातील दोषींना एका महिन्याच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते. न्यायालयाकडून ब्लॅक वॉरंट जारी केल्यानंतर या सर्व दोषींना केव्हाही फाशी दिली जाऊ शकते. 

काँग्रेसच्या सभेत कार्यकर्ता म्हणाला, प्रियंका चोप्रा जिंदाबाद

गंभीर घटनांमध्येच फाशी

आपल्या कायद्यानुसार अत्यंत घृणास्पद आणि गंभीर प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यामुळे सामान्यत: जल्लादची गरज पडत नाही. तसेच या पदासाठी स्थायी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे कठीण होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tihar jail officials do not have hangman