टिकटॉकवर झाले प्रेम; प्रेयसी समोर आली अन्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

टिकटॉकवरून प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे दररोज एकमेकांशी बोलण्याबरोबरच चॅटिंग करू लागले. दोघेही प्रेमात अखंड बुडाले. पण, तिला सर्वप्रथम पाहिल्यानंतर तो अवाकच झाला.

वाराणसी (उत्तर प्रदेश): सोशल मीडियावरून प्रेम होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोशल मीडियावरील प्रेमवीर सर्वप्रथम समोर आल्यानंतर अवाक होताना दिसतात. अशीच एक घटना येथे घडली आहे.

टिकटॉकवरून मुंबई येथील युवतीचा वाराणसीमधील युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे दररोज एकमेकांशी बोलण्याबरोबरच चॅटिंग करू लागले. दोघेही प्रेमात अखंड बुडाले. एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. युवकाचा मोबाईल खराब झाल्यामुळे दोघांचा संपर्क तुटला. यामुळे युवती नैराष्यात जाऊ लागली. युवकाने पुन्हा फोन सुरू केला पण तो साधा फोन होता. त्यामुळे युवतीला त्याला पाहता येत नव्हते. अखेर एक दिवस युवतीने घरी कोणालाही काही न सांगता वाराणसीला जाण्याचे ठरवले.

युवती रेल्वेने वाराणसीच्या रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. प्रियकराला आपण आल्याचे सांगितल्यानंतर तो सुद्धा खुष झाला आणि रेल्वेस्टेशनवर दाखल झाला. पण, तिला सर्वप्रथम पाहिल्यानंतर तो अवाकच झाला. कारण, प्रेयसीची उंची होती सहा फुटापेक्षा जास्त अन् युवकाची उंची होती साडेचार फुट.

प्रियकराने प्रियेसीला घरी न नेता थेट पोलिस चौकीत घेऊन गेला. पोलिसांना सर्वमाहिती सांगितले. पोलिसांनी युवतीच्या घरच्यांशी संपर्क साधून ती सुखरूप असल्याचे सांगून, तिला घ्यायला बोलावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiktok girlfriend came in front over got shocked